Congratulations….

डी . वाय . पाटील अभियांत्रिकीच्या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स विभागाचा विद्यार्थी आर्य विक्रम खोचागे याची युआयपॅथ स्टुडन्ट डेव्हलपर चॅम्पियन” म्हणून निवड झाली.
  युआयपॅथ ही ऑटोमेशन, रोबोटिक आणि एआय वर काम करणारी कंपनी आहे. या कंपनीद्वारे घेण्यात आलेल्या ” युआयपॅथ स्टुडन्ट डेव्हलपर चॅम्पियन” या स्पर्धेमध्ये विविध १३ देशामधून १ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील १०० विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये आर्यची निवड झाली. या निवडीअंतर्गत आर्यला कंपनीतर्फे रोबोटिक ऑटोमेशन प्रोसेसवर ट्रेनिंग मिळणार आहे. या स्पर्धेसाठी त्याला आर्टीफिसिअल इंटेलिजन्स विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील तसेच महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर मकरंद काईंगडे व प्रा. सुदर्शन सुतार यांनी प्रयत्न केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन मिळाले.